मुंबई : अभिनेत्री शेहनाज गिलचा भाऊ शाहबाज कौरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंवर दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे काही फोटो शेअर केले आहेत. सिद्धार्थचे फोटो शेअर करत त्याने प्रत्येक फोटोच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थबद्दल दोन ओळी लिहिल्या आहेत. सध्या शाहबाजने सिद्धार्थसाठी केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शाहबाज आणि सिद्धार्थबद्दल सांगायचं झालं तर दोघे बिग बॉसच्या घरात एकत्र होते. नुकताचं शाहबाजने सिद्धार्थसोबत एक फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'मला तुझ्याकडून बरंच काही शिकायला मिळालं आहे. मला ठावूक आहे की मी देखील तुझ्यासारखं काही मोठं करू शकेल.' शाहबाजच्या या पोस्टवर चाहत्यांनी शेहनाजबद्दल विचारणा केली आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेन्ड शेहनाजची प्रकृती कशी आहे, आसा प्रश्न चाहते विचारात आहेत.



एका चाहत्याने कमेन्ट सेक्शनमध्ये लिहिलं की, 'शेहनाज कशी आहे, ती ठिक तर आहे ना ?' दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, 'आम्ही आता शेहनाजमध्ये सिद्धार्थला शोधू. सिद्धार्थने  ज्याप्रमाणे बिग बॉसमध्ये शेहनाजला शोधलं....' सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजला मोठा धक्का बसला आहे. ती या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.