Sherlyn Chopra at Airport: सध्या फॅशन ही बदलताना दिसते आहे. त्यामुळे आपण सगळेच त्याप्रमाणे अपडेट होत आहोत. सेलिब्रेटीही त्याप्रमाणे अपडेट होताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडेच चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या फॅशनची. अशावेळी ही फॅशन फॉलो करता करता सेलिब्रेटी (Celebs Oops Moment) हे कधी उप्स मुमूेंटचे शिकार होतील हेही कळणार नाही. सध्या एअरपोर्ट लुक आणि जिम लुक व्हायरल होताना दिसतात. अभिनेत्री मलायका अरोरा तर यात अगदीच मास्टर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती अनेकदा जीमच्या बाहेर स्पॉट होते आणि तिचा जीम लुक कोण चर्चेत राहतो. परंतु मलायकाला टक्कर द्यायला आलेली या अभिनेत्रीनं तर एअरपोर्टवर जलवा दाखवला आहे. यावेळी तिनं इतका रिव्हिलिगं ड्रेस घातला होता की त्यामुळे ती चक्क ट्रोल झाली आहे. 


सध्या विक्षिप्त फॅशनचा पुर आला आहे. तुम्ही कशीही फॅशन करा ती ट्रेण्ड होतेय. सध्या सोशल मीडियावर अशा सेलिब्रेटींना फॉलो करणारेही अनेकजण आहेत. उर्फी जावेद हे सध्याचं ताजं उदाहरण आहे. त्यातून आता सध्या चर्चा आहे ती म्हणजे रिव्हिलिंग फॅशनची (Revealing Dress). ब्रालेट आणि ओपन लुक (Airport Look) असणारे कपडे आता मुलींमध्येही फेमस आणि ट्रेण्ड होऊ लागले आहे. असे कपडे घातल्यानं सेलिब्रेटीही हे कायमच ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा त्यांच्यावर टीकाही होताना दिसते. परंतु अशी फॅशन आता कॉमन होऊ लागली आहे आणि सर्वसामान्यांपर्यंतही पोहचली आहे. 


हेही वाचा - एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला किस केल्यानं हिना खान ट्रोल! नेटकरी म्हणाले, ''इतकं...''


राखी सावंत, साजिद खानमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Rakhi Sawant and Sherlyn Chopra) आता एका नव्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या तिच्या ड्रेसमुळे तिला ट्रोलर्सनी ट्रोल केंल आहे. काहींनीतर तिला सरळ उर्फीची बहीण कुर्फी म्हणलं आहे. शर्लिननं यावेळी ऑरेंज कलरचा पलाझो ड्रेस घातला होता. यावेळी तिचा टॉप हा ब्रालेटप्रमाणे होता आणि खाली पॅन्ट होती. तिनं केस मोकळे सोडले होते आणि सोबतच हाय हिल्स घातल्या होत्या. यावेळी तिची बॅक अत्यंत रिव्हिलिंग होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ट्रोलर्सनी मात्र तिला ट्रोल करण्यासाठी एकही संधी सोडली नाही. एकानं म्हटलंय की, 'अरे ही तर उर्फीची बहीण बर्फी आहे.' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, 'एअरपोर्ट आहे की रॅम्पवॉकचं ठिकाणं'. यालाच धरून एका युझरनं लिहिलंय की, 'एअरपोर्ट तर आता एक मॉडेलिंग हब बनलं आहे.' तर अनेकांनी तिला तिच्या वयावरूनही ट्रोल केलं आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल (VIDEO) होतो आहे.