एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला किस केल्यानं हिना खान ट्रोल! नेटकरी म्हणाले, ''इतकं...''

Hina Khan Video: अभिनेत्री हिना खान ही आपल्या दिलखेचक अदाकारींसाठी ओळखली जाते. तिची अनेकदा (Hina Khan Trolled) चर्चाही होताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु यावेळी तिला ट्रोल करण्यात आलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 25, 2023, 07:10 PM IST
एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला किस केल्यानं हिना खान ट्रोल! नेटकरी म्हणाले, ''इतकं...'' title=
(Photo : Viral Bhayani | Instagram)

Hina Khan Video: अभिनेत्री हीना खान ही कायमच चर्चेत असते. ये रिश्ता क्या केहेलाता हैं या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर टेलिव्हिजनवरील (Hina Khan With Boyfriend) सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणून तिची ओळख झाली आहे. मध्यंतरी तिनं बिग बॉसमध्येही हजेरी लावली होती. सतत कुठल्या ना कुठल्यातरी कारणामुळे चर्चेत राहणारी हिना खान ही आता वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी आपल्या बॉयफ्रेंडला भेटल्यावर तिनं त्याला मिठी मारली आणि त्यांनी एकमेकांना कीस केलं. यावेळी हे पाहून नेटकरी मात्र संतप्त झाले आहेत. 

हिना खान यावेळी खूप चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तिला (Hina Khan Trolled) त्यावरून खूप ट्रोल करायला सुरूवात केली आहे. हिना खान हिनं श्रीनगर येथील G20 सबमिटला हजेरी लावली होती. एअरपोर्टवर परताना मात्र ती प्रचंड ट्रोल झाली आहे. यावेळी ती आपला बॉयफ्रेंड रॉकी जैसवालसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. यावेळी तिचा हा पीडीए मुमेंट होता. एअरपोर्टवरून ती थेट आपल्या कारकडे धावली होती. परंतु यावेळी तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.

तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की ती आपल्या बॉयफ्रेंडचा (Hina Khan at Airport) हात हातात घेत चालताना दिसते आहे. यावेळी त्यांनी पापाराझींना पोझ दिली आणि आपल्या कारकडे परत जाताना त्यांनी एकमेकांना कीस केलं. यावेळी हिनानं ब्लॅक कलरचा कोट घातला होता आणि ब्लू जीन्सही घातली होती तर तिच्या बॉयफ्रेंडनं यावेळी काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट्स घातली होती.  

हेही वाचा - एअरपोर्टवर बॉयफ्रेंडला किस केल्यानं हिना खान ट्रोल! नेटकरी म्हणाले, ''इतकं...''

यावेळी हिना खानला अनेकांनी ट्रोल केलं आहे. काही युझर्सनी तिला निर्लज्जपणा म्हणत ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलंय की, किस करणं काय गरजेचे आहे का? तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, अरे लोकांसमोर काहीतरी लाज बाळगा. तर एका युझरनं लिहिलंय की, नुसता शो ऑफ आणि त्यानंतर पाहणं की आपणं कॅमेऱ्यात कैद झालोय का? तर दुसऱ्यानं लिहिलंय की, काय प्लॅनिंग आहे. तर एकानं लिहिलंय की, काही पण. कॅमेरेवाल्यांना बोलवा आणि मग असं काहीतरी करा म्हणजे हेडलाईनमध्ये याल. तर दुसऱ्यानं लिहिलं की, ही चांगली स्किम आहे न्यूज हेडलाईन बनवायची. 

काही दिवसांपुर्वी हिना आणि त्याच्या बॉयफ्रेंडचं ब्रेकअप झालं आहे अशा चर्चा रंगल्या होत्या परंतु हे खोटं होतं असं हिनानंच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या चर्चांना पुर्णविराम लागला होता.