आलिया - रणबीरच्या लग्नानंतर तिच्या Ex Boyfriend चं ब्रेकअप? चर्चांना उधाण
आलिया भट्टने नव्या आयुष्याला सुरुवात केली, तर दुसरीकडे Ex Boyfriend चं होणार ब्रेकअप? सर्वत्र चर्चेला उधाण
मुंबई : अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री आलिया भट्ट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत होती. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकल नाही. 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीरचं लग्न झालं. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थने दोघांना शुभेच्छा देखील दिल्या. तेव्हा सिद्धार्थची एक कमेंट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली. आता देखील सिद्धार्थ चर्चेत आला आहे.
यावेळी रंगणाऱ्या चर्चेमागे कारण आहे, अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत असलेलं सिद्धार्थचं नातं. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या . 'शेरशाह' सिनेमातील त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं.
आता सिद्धार्थ आणि कियाराचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये वाद सुरू आहे. दोघे आता एकमेकांना भेटत देखील नसल्याचं समोर आलं आहे. कियारा - सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या चर्चांनी चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांचे एकमेकांशी चांगले बाँडिंग आहे. एवढंच नाही तर, दोघेही लग्न करू शकतात असं देखील कळत होतं. पण दोघांमध्ये असं काय घडलं, ज्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे अद्याप कळू न शकल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.