मुंबई : 41 वर्षीय शिबानी दांडेकरने नुकतंच फरहान अख्तरसोबत लग्न केलं आहे. शिबानी बऱ्याच दिवसांपासून फरहानला डेट केल्यामुळे चर्चेत होती. फरहानशी लग्न केल्यानंतर शिबानी सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाली आहे. दरम्यान, शिबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्री तिचा पुन्हा-पुन्हा रिव्हिलिंग ड्रेस फिक्स करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिधान केला लेदर जंपसूट 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिबानी दांडेकर पती आणि अभिनेता फरहान अख्तरसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिबानीने काळ्या रंगाचा लेदरचा ऑफ शोल्डर जंपसूट घातला आहे आणि ती कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.


पुन्हा पुन्हा सरकत होता ड्रेस  
शिबानी दांडेकरचा ऑफ-शोल्डर ड्रेस असण्याव्यतिरिक्त, तो बराच  रिवीलिंग होता.  व्हिडिओ पाहून असं दिसतं की, शिबानी या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाही आणि व्हिडिओमध्ये तिचा हा ड्रेस वारंवार वर सरकताना दिसत होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


महीप कपूरच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली 
शिबानीचा हा व्हिडिओ संजय कपूरची पत्नी महीप कपूरच्या बर्थडे पार्टीतला आहे. ज्यामध्ये शिबानी पती फरहान अख्तरसोबत हजेरी लावण्यासाठी गेली होती. यादरम्यान अभिनेत्री रिव्हीलिंग ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली.