COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, महेश मांजरेकर यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या, शिकारी सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे, या प्रोमोने नेटीझन्स पुरते घायाळ झाले आहेत, यामुळे हा प्रोमो व्हायरल होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आहेत. तर दुसरीकडे या सिनेमाचा प्रोमो पाहूनच या सिनेमावर रिलीज होण्याआधी टीका होत आहे. विजू माने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे, तर दिग्दर्शन विजय पाटील यांनी केलं आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सने आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की अशा सिनेमाची निर्मिती मराठीत करू नये, अशा मुळे मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळणार नाहीत.


मात्र यूट्यूबवर या सिनेमाच्या प्रोमोला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण काही प्रेक्षकांनी या प्रोमोचे आणि कलाकारांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. आपल्याला हा प्रतिक्रिया व्हिडीओच्या खाली पाहाता येतील.