मुंबई:बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सिनेमांपासून लांब असल्याचे दिलत आहे. त्याचा काडीमात्र फरक तिच्या चाहत्यांना पडत नाही. इन्स्टाग्रामवर शिल्पाचे 90 लाख चाहते आहेत. त्यामुळे शिल्पाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते.नुकताच शिल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात शिल्पा रिक्षात सफर करताना दिसत आहे.तब्बल 15 वर्षांनंतर शिल्पा रिक्षाने प्रवास करताना दिसत आहे. व्हायरल भयानी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिल्पाचा हा प्रवास व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


 



शिल्पा आता सुपर डान्सर चॅप्टर 3 या रियालिटी शोची परीक्षक आहे. त्याचबरोबर शिल्पा फिटनेस कॅम्पेन सुद्धा करते. सध्या ट्रेण्डमध्ये आहे 10 Year Challenge अतिशय सोपे असे हे चॅलेंज आहे. आपले १० वर्षे जुने फोटो आणि आताचे फोटो यामध्ये तुलना करणारा असा हा चॅलेंज आहे. हे चॅलेंज शिल्पानेही स्वीकारले आहे. शिल्पाने तिचा 10 वर्ष जुना फोटो शेअर केला आहे.