मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्याशी संबंधित असे अनेक वादही आहेत, जे अनेक दिवसांपासून न्यायालयात सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे 2007 साली हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेचे (Richard Gere) Kissing प्रकरण, यासंबंधीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत या प्रकरणी तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यासाठी शिल्पानं न्यायालयात धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा शेट्टीने याचिकेत दावा केला आहे की, तिच्यावर एकच आरोप आहे की, रिचर्ड गेरेने तिला Kiss केलं तेव्हा तिने विरोध केला नाही आणि त्यामुळे तिनं हे सगळं ठरवलं होतं हे म्हणू शकत नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, वकील प्रशांत पाटील यांनी दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, 'प्रतिवादी (शिल्पा शेट्टी कुंद्रा) मूळ तक्रारदाराच्या हातून दुर्भावनापूर्ण कारवाई आणि छळाचा बळी आहे. तर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून पब्लिक आणि खासगी आयुष्यात नेहमीच जबाबदारीने वागली आहे.


जेव्हा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने दिल्लीत एड्स जनजागृती मोहिमेदरम्यान स्टेजवर शिल्पा शेट्टीच्या गालाचवर Kiss केलं होतं. (Photo Credit : Reuters)

या वर्षी जानेवारीमध्ये महानगर दंडाधिकारी केतकी चव्हाण यांनी शिल्पा शेट्टीची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर न्यायालयाने तिला केवळ 'बळी'च नाही, तर क्लीन चिटही दिली. निकालाच्या एका भागामध्ये असे म्हटले आहे की, 'शिल्पा शेट्टीवरील आरोप निराधार आहे.' मात्र, नंतर अलवर पोलिसांनी या निर्णयाला आव्हान दिले.


ही गोष्ट 2007 सालची आहे. जेव्हा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरेने दिल्लीत एड्स जनजागृती मोहिमेदरम्यान स्टेजवर शिल्पा शेट्टीच्या गालाचवर Kiss केलं होतं. यामुळे अनेक लोक संतप्त झाले आणि त्यांनी अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला. त्यानंतर दोघांविरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.


दरम्यान, शिल्पा अखेरची अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया (Shirley Setia)  यांच्यासोबत 'निकम्मा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळू शकले नाही. आता शिल्पा ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​देखील आहे.