मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पाने तिच्या योगाच्या व्हिडिओ सीडी आणि तिचं फिटनेस अॅप लॉन्च केलं आहे. पण आता शिल्पा केवळ अॅपवरच नाही तर, संपूर्ण भारतवासियांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. शिल्पा शेट्टीची केंद्र सरकारच्या फिट इंडिया Fit India अभियानासाठी असलेल्या कमेटीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वत: शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंतप्रधान मोदींद्वारा सुरु करण्यात आलेल्या फिट इंडिया अभियानच्या सल्लागार समितीमध्ये माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मला आशा आहे की, मी प्रत्येक भारतीयाला तंदुरुस्त राहण्याचे सोपे मार्ग शोधण्यात मदत करू शकेल आणि हे अभियान यशस्वी करु शकेन.' असं म्हणत तिने याबाबत ट्विट केलं आहे.



पंतप्रधान मोदींनी या फिट इंडिया अभियानमध्ये, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, नॅशनल स्‍पोर्ट्स फेडरेशन, सरकारी अधिकारी आणि फिटनेसची आवड असणाऱ्या लोकांचा समावेश केला आहे.



फिट इंडिया अभियान 29 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली शिल्पा तब्बल 13 वर्षांनंतर आगामी 'निकम्मा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.