Shilpa Shetty 2013 Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच आता शिल्पा शेट्टीच्या 11 वर्षे जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने निर्णय दिला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 2013 मधील आहे. एका मुलाखतीच्या वेळी तिने हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अनेक टीकांचा सामना देखील करावा लागला होता. त्यासोबतच तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासा


शिल्पा शेट्टीच्या या वक्तव्यामुळे चूरूच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये सलमान खानचे देखील नाव होते. आता या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दिलासा देत तिच्याविरुद्ध दाखल केलेला FIR रद्द केला आहे. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर देखील माफी मागितली होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली, ज्यामध्ये न्यायमूर्ती अरुण मोंगा यांच्या न्यायालयाने हा एफआयआर फेटाळला. न्यायमूर्ती मोंगा यांनी आपल्या निर्णयात स्पष्टपणे सांगितले की, SC/ST कायद्यांतर्गत FIR नोंदवण्यापूर्वी योग्य कलम आणि तपास करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, शिल्पा शेट्टीने म्हटलेला शब्द कोणत्याही जातीचा किंवा जातीशी संबंधित शब्दाचा भाग नाही. ज्याचा वापर इतर कोणाचाही अपमान करण्यासाठी केला जात नव्हता तर स्वतःचा उल्लेख करण्यासाठी केला जात होता. 


नेमकं प्रकरण काय? 


2017 मध्ये अशोक पंवार यांनी शिल्पा शेट्टी आणि सलमान विरुद्ध SC/ST कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यांचा आरोप होता की 2013 मध्ये एका टीव्ही मुलाखतीदरम्यान या दोघांनी वादग्रस्त शब्द वापरला होता. तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि 18 जानेवारी 2018 रोजी तपास अधिकाऱ्यांनी दोघांनाही नोटीस बजावली.