शिल्पा शेट्टीला सासू-साऱ्यांचा पडतो ओरडा, Super Dancer च्या मंचावर सांगितलं कारण...
पण बऱ्याचदा स्पर्धक जबरदस्त परफॉर्म करुन देखील जज त्यांना काही शुल्लक गोष्टीसाठी बोलतात , तेव्हा मात्र या गोष्टीचा शिल्पाच्या सासू-सासऱ्यांना राग येतो.
मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील सुपर डान्सर सीजन 4 सध्या प्रेक्षकांच्या एंटरटेनमेंटचा डेली डोस बनला आहे. या सीजनमधील स्पर्धेकांनी एकापेक्षा एक असे जबरदस्त परफॉर्मन्स सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये हा शो टॉपला आहे. त्यात या शोमध्ये परिक्षक देखील काही कमी नाहीत.. शिल्पा शेट्टी , अनुराग बासू आणि गीता कपूर यांचा बबली अंदाज सगळेच एन्जॉय करत आहेत.
पण परिक्षक शिल्पा शेट्टीने नुकताच या मंचावर एका खास गोष्टीचा खुलासा केला आहे. तिच्या एका गोष्टीसाठी तिला सासू-सासऱ्यांचा ओरडा खावा लागतो, एवढंच काय तर शिल्पाची आईदेखील तिला बऱ्याचदा खडेबोल सुनावते असं तिने म्हटलंय. यामागचं कारण शिल्पाने शेअर केलंय. शिल्पासह दिग्दर्शक अनुराग बासूला देखील त्याच्या घरच्याचा ओरडा पडतो.
त्याच कारण म्हणजे, परिक्षकाच्या खुर्चीवर बसून हे परिक्षक आपली बाजू मांडत असतात. प्रत्येक स्पर्धेकाला काय चुक-काय बरोबर याची जाणीव करुन देत असतात. नेहमीच प्रत्येक स्पर्धकांनं आणखीनं चांगल परफॉर्म करावं हेच यामागचं कारण असतं.
पण बऱ्याचदा स्पर्धक जबरदस्त परफॉर्म करुन देखील जज त्यांना काही शुल्लक गोष्टीसाठी बोलतात , तेव्हा मात्र या गोष्टीचा शिल्पाच्या सासू-सासऱ्यांना राग येतो. आणि जेव्हा शिल्पा त्यांना समोर भेटते , तेव्हा ते तिला या गोष्टीवरुन ओरडाला सुरुवात करतात. शिल्पाची आई देखील याबाबतीत मुलीवर फार रागावते.
अनुराग बासू यांना देखील माझ्या मुली मला फार ओरडत असल्याचं सांगितलंय."कठोर जज बनू नका, तुम्हाला डान्सचं काय माहित आहे." असे खडेबोल अनुराग यांना ऐकावे लागतात.