`या` फोटोमुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल
काय आहे हा फोटो
मुंबई : सोशल मीडियावर ट्रोल होण्याचा अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला अजिबातच सवय नाही. पण तिच्या हटके फॅशनमुळे बॉलिवूडची ही लोकप्रिय अभिनेत्री ट्रोल झाली आहे. अनेकदा आपण फॅशनच्या नावाखाली काहीही करतो अशीच काहीशी गोष्ट शिल्पा शेट्टीने केली आहे. शिल्पा अशा कारणामुळे ट्रोल झाली आहे जिथे तिचं कुणीही समर्थन करू शकत नाही.
खरंतर हा फोटो काहीसा जुना आहे, मात्र सध्या नेटिझन्सनी पुन्हा एकदा या फोटोवरुन चर्चेला उधाण आणलं आहे. या फोटोमध्ये शिल्पा तिचा मुलगा विवानसोबत रस्त्यावरुन चालताना दिसते आहे. मात्र, चर्चेचा विषय म्हणजे या फोटोत शिल्पाने फक्त कुर्ताच परिधान केलेला दिसतो आहे. कुर्त्याच्या खाली मात्र शिल्पाने काहीच घातलं नाहीये. नेमकं हेच कारण आहे ज्यामुळे पुन्हा एकदा शिल्पा जबरदस्त ट्रोल होते आहे. ‘मॅडमने कुर्ता तर घातलाय पण बहुधा घाईघाईत त्या पँट घालायला विसरल्या आहेत..’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्स या फोटोवर करत आहेत.
शिल्पाच्या या फोटोवर आणि विशेषत: तिच्या या अजब गजब ड्रेसिंग स्टाईलमुळे, नेटिझन्सनी कमेंट्सचा आणि टिकांचा पाऊस पाडला आहे. कुणी पायजमा न घालण्यावरुन तिला टोमणा मारलाय, तर कुणी ‘इंडिया मैं कौनसा भी फॅशन चलता है’ म्हणत तिचं समर्थन केलं आहे.