मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकदा चर्चेचा विषय बनलेली असते. त्यामुळेच ती सोशल मीडियामध्येही ट्रोल होत असते. नुकतीच शिल्पा मालदीवमध्ये परिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचे फोटोही शिल्पा सोशल मीडियात शेअर करत आहे. 


शिल्पा शेट्टी ट्रोल -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालदीवमध्ये माश्यांसोबत खेळताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र त्यावरून शिल्पा शेट्टी टोल होत आहे. एका व्हिडिओमध्ये शिल्पा पकडलेल्या माशाला पुन्हा पाण्यात सोडायला सांगत आहे. या व्हिडिओवरून शिल्पाची खिल्ली उडवली जात आहे. शिल्पा शेट्टी पेटा ची ब्रॅन्ड अ‍ॅँम्बॅसेडर आहे. टोल करताना शिल्पाला सार्‍यांनी ढोंगी म्हटले आहे. तिच्याकडून अवॉर्ड परत घ्यावा असे सांगितले जात आहे. तिला कोणत्याही प्राण्याला त्रास देण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची टीका तिच्यावर केली जात आहे. 


 



शिल्पाचं स्पष्टीकरण - 


शिल्पा शेट्टीने या प्रकारणी खुलासा केला आहे. स्पष्टीकरण देताना शिल्पा म्हणाली, ती शाकाहारी आहे. खाण्यासाठी मासा पकडलाच नव्हता. त्यामुळे त्याला पुन्हा पाण्यात सोडण्यात आले. माश्याला कोणत्याही प्रकारची इजा करण्यात आलेली नाही हेदेखील तिने स्पष्ट केले आहे.