अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला देणार घटस्फोट? सोशल मीडियावर दिली हिंट

अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या नात्यावर मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून नक्की काय सांगायचंय?
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर सध्या केस सुरू आहे. डर्टी पिक्चर प्रकरणात त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिल्पा साक्षीदार होणार असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिल्पा राजला घटस्फोट देणार की नाही यावर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. शिल्पाने एका पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाचा इशारा करते का अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे.
शिल्पा शेट्टीच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. लोक या पोस्टला शिल्पा शेट्टीच्या घटस्फोटाच्या निर्णयाचे लक्षण असल्याचं समजत आहेत. शिल्पा शेट्टीने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पुस्तकाचे पेज शेअर केलं. या पानावर 'वाईट निर्णय' यावर एक दृश्य दर्शवते. एवढेच नाही तर 'वाईट निर्णया'सह आणखी एक शब्द बोलला गेला आहे, तो म्हणजे 'ब्रांड न्यू एंडिंग'. चाहत्यांनी याच शेवटच्या शब्दामुळे शिल्पा घटस्फोटाच्या तयारीत तर नाही ना अशी शंका व्यक्त केली.
या पानावर नक्की काय लिहिलंय?
'घेतलेले वाईट निर्णय, आपण केलेल्या चुका, आपल्याकडून दुखावलेले मित्र यांचे विश्लेषण करण्यात आपण बराच वेळ घालवू शकतो. फक्त हुशार असतो, अधिक धैर्यवान किंवा फक्त चांगले असतो तर. आता कितीही सांगायला गेलं स्पष्टीकरण द्यायला गेलं तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही.'
'मात्र आपण नव्या मार्गांनी पुढे जाऊ शकतो. अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो. जुन्या चुका सुधारू शकता आणि आपल्या लोकांसाठी आपण चांगले बनू शकते. भविष्याला तुमच्या मतांनुसार करू शकता असंही पुढे म्हटलं आहे. शिल्पाच्या या पोस्टमुळे ती घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत शिल्पाने अधिकृतपणे सध्यातरी कोणताही खुलासा केला नाही. चाहत्यांनी ती घटस्फोट घेऊ शकते असा या पोस्टवरून कयास लावला आहे.