Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. शिल्पा शेट्टी ही सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओत शिल्पानं मन्डे मोटिव्हेशन दिलं आहे. मात्र, शिल्पाच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडीओत शिल्पानं काळ्या रंगाचं टी-बॅक आणि जांभळ्या रंगाची टाईट्स परिधान केली आहे. या व्हिडीओला शेअर करत शिल्पानं कॅप्शन दिलं की Recipe for ABS OF STEEL 1. A bench for these body weight core exercises. 2. Perform each exercise for 45 seconds in a circuit. 3. Rest for 45 seconds & repeat for four rounds. वरील सगळ्या वर्कआऊटला मिक्स कर आणि तुमच्या पुढच्या वर्कआऊटमध्ये करा. त्यानं तुमची कोर स्ट्रेन्थ वाढेल. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'देवळात जावंसं वाटतं तर जा! नाहीतर...', मराठमोळ्या अभिनेत्रीनं मासिक पाळीवरील बेधडक पोस्ट चर्चेत


शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. काही नेटकऱ्यांनी शिल्पाला ट्रोल केलं आहे.  एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'काय फायदा नवरा तर राज कुंद्राच आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला असं वाटतंय की नवऱ्याच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी प्रॅक्टिस करते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुला पाहून आमचं वर्कआऊट होतं.' आणखी काही नेटकऱ्यांनी शिल्पाची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मॅम तुमचं खरं वय काय हे सांगा.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'मॅम तुमचा खूप चांगला फिटनेस आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्हाला वर्कआऊट करताना पाहून आम्हाला प्रेरणा मिळते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तुमची एनर्जी, फ्लेक्झिबिलीटी आणि शिस्त या सगळ्या नेहमीच मन जिंकतात.' तर एका नेटकऱ्यानं शिल्पाला ट्रोल होताना पाहून तिला  पाठिंबा देत पुढे आला आणि म्हणाला की 'ती जे करते ते तुम्ही करून दाखवा. ती किती फीट आहे ते पाहा.' शिल्पा लवकरच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स या सीरिजमध्ये दिसणार आहे.