शिल्पा शेट्टीकडून रणवीर सिंगची नक्कल, व्हिडिओ व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये शिल्पा अभिनेता रणवीर सिंगची नक्कल करताना दिसत आहे.
शिल्पाने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे
शिल्पाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती रणवीरच्या 'रामलीला'मधील 'तड तड' या सुपरहिट गाण्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने बाधलेले केस दाखवताना दिसत आहे. याचबरोबर तिने रणवीरची या गाण्यातील स्टेपदेखील फॉलो केली आहे. यानंतर, ती स्वतः मागे बघून हसू लागते.
शिल्पाला रणवीरकडून प्रेरणा मिळते
हा व्हिडिओ पोस्ट करत शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आज खूप दिवसांनी डान्स करण्याचा मूड झाला, त्यामुळेच मला रणवीर सिंगकडून प्रेरणा मिळाली.' काही काळापूर्वी अभिनेत्रीने मागून मानेच्या वरचे केस कापले होते. परंतु आता या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या नजरा तिच्या केसांवर लागल्या आहेत. जे आता वाढले आहेत.