शुटींगदरम्यान शिल्पा शेट्टीला दुखापत, रुग्णालयातील फोटोने चाहत्यांमध्ये खळबळ
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दुखापत झाली आहे. वेब सीरीजच्या शुटींगदरम्यान दुखापत झाल्याचं बोललं जात आहे.
Shilpa Shetty Injures: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशीही जोडलेली असते. अभिनेत्रीने अशी पोस्ट केली आहे की ज्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. नुकताच तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये दिसत आहे.
शिल्पा शेट्टीचा फोटो समोर येताच चाहत्यांनी अभिनेत्रीला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ती तिच्या वेब सीरिजचे शूटिंग करत होती आणि याच दरम्यान तिला दुखापत झाली.
शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून तिने पायाला इममोबिलायझर लावला आहे. शिल्पा व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. फोटो पोस्ट करताना, अभिनेत्रीने लिहिले की, तिने भूमिका, कॅमेरा आणि अॅक्शन म्हटले आणि मी माझा पाय मोडला. 6 आठवडे काही करू शकत नाही पण मी लवकरच परत मजबूत आणि बरी होईल. तोपर्यंत लक्षात ठेवा. प्रार्थना नेहमी काम करते. या फोटोत शिल्पाने एक मोठं स्माईलही दिली आहे.
शिल्पा शेट्टीने यापूर्वी तिच्या शूटिंग सीनचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती अॅक्शन करताना दिसत होती. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की, याच शूटिंगदरम्यान अभिनेत्रीला दुखापत झाली असावी. शिल्पा शेट्टी गोव्यात रोहित शेट्टीसोबत 'इंडियन पोलीस फोर्स' या आगामी वेब सीरिजचे शूटिंग करत होती.
रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वातील ती पहिली महिला पोलीस बनली आहे. या वेब सिरीजमध्ये शिल्पा शेट्टीसोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय हे देखील दिसणार आहेत. या शोमधून रोहित ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली छाप पाडणार आहे.