मुंबई : शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) चे पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला मंगळवारी जामीन मंजूर झाली. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा गेले 62 दिवस कारागृहात होता. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे राज कुंद्रा आपल्या कुटुंबाशी भेटू शकले. यानंतर राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा त्याच्या मुलाची भेट पाहायला मिळालीच पण त्यासोबतच बॉडीगार्डचं राज कुंद्रा प्रती असलेलं प्रेम आणि एकनिष्ठा देखील पाहायला मिळाली. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 


हिरोप्रमाणे धावताना दिसला रवी बॉडीगार्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज कुंद्रा (Raj Kundra) जेव्हा जुहूतील बंगल्यावर काळ्या रंगाच्या मर्सिडीजमधून पोहोचला. यावेळी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा बॉडीगार्ड रवी अगदी गाडीसमोर जोरात धावताना दिसला. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राज कुंद्राला मीडिया आणि चाहत्यांपासून प्रोटेक्ट करण्यासाठी रवी गाडीसमोर धावताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे.  



सोशल मीडियावर होतेय रवीची चर्चा 


आपल्या कामावर आणि मालकावर निष्ठा दाखवणाऱ्या अंगरक्षक रवीचं कौतुक होत आहे. कामाप्रती त्यांचे समर्पण पाहून लोक सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करत आहेत. जेव्हा शिल्पा शेट्टीचे वडील मरण पावले तेव्हा रवी संपूर्ण वेळ सुनंदा शेट्टीसोबत उभा राहिली होती. तो त्यांच्या कुटुंबातीलच एक भाग आहे. 


एकनिष्ठ असल्याचं दिलं उदाहरण 


हा व्हिडिओ पापाराझी विरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कमेंट सेक्शनमधील लोक त्याला निष्ठेचे उदाहरण म्हणत आहेत. एका युझरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, अशी निष्ठा मिळवणे कठीण आहे, ते सुरक्षित ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका युझरने लिहिले - हा व्हिडिओ खरोखरच भावनिक आहे. तो त्याच्या कामाचा आणि मालकाचा किती आदर देतो हे स्पष्ट दिसत आहे.