शिल्पा शेट्टीची साडेसाती संपेनाच, आता आईला अटक होताना पाहणार का अभिनेत्री?
नुकताच तो आपलं तोंड लपवत मीडियाला चकवा देण्याचा प्रयत्न करत सिनेमा पाहण्यासाठी पोहोचला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मागे एकामागोमाग एक संकंट येतच आहेत. तिचा पती राज कुंद्रा याची जामीनावर सुटका झाली आहे, पण तरीही त्याला आता तोंड लपवूनच चार चौघात फिरावं लागत आहे.
नुकताच तो आपलं तोंड लपवत मीडियाला चकवा देण्याचा प्रयत्न करत सिनेमा पाहण्यासाठी पोहोचला होता.
आता शिल्पा शेट्टीच्या आईच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिल्पाच्या पतीनंतर आता तिची आई वादात सापडली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
अंधेरी कोर्टाकडून जामीन पूर्व अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 21 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
त्यामुळे अभिनेत्री देखील पुन्हा चर्चेत आली आहे. परहड आमरा या ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने ही तक्रार केल्याचं समजतंय.