शिल्पा शेट्टीच्या आईला मोठा दिलासा; फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर, फसवणूक प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सुनंदा शेट्टी यांच्यावर २१ लाखांच्या व्यवहारा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता त्यांना कोर्टातून जामीन मिळाला आहे.
शिल्पाच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
शिल्पाची आई फसवणूक प्रकरणात अडकली होती. मात्र, आता मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना फसवणूक आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. एवढंच नाही तर तिच्याविरुद्ध जारी केलेलं अजामीनपात्र वॉरंटही न्यायालयाने फेटाळलं आहे. ही बातमी समोर येताच शिल्पाच्या संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्रकरणाबद्दल तपशीलवार जाणून घ्या
एका ऑटोमोबाईल एजन्सीचे मालक कौन्सिलर फिरोज आमरा यांनी शिल्पा शेट्टीच्या आईविरुद्ध २१ लाख रुपयांच्या व्यवहारासाठी गुन्हा दाखल केला होता. ते म्हणाले की, अभिनेत्रीचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी 2015 मध्ये त्यांच्याकडून 21 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होते, परंतु 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर शेट्टी कुटुंबाने कर्जाची रक्कम देण्यास नकार दिला