मुंबई : अनेक बॉलिवूड स्टार्स डाएट आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतात. फिटनेसची काळजी घेण्यासाठी ते ऑरगॅनिक फूडवर भर देतात. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरात फळं आणि भाज्या पिकवण्यास सुरुवात केली आहे. घरच्या बागांपासून ते शेतापर्यंत, सेलिब्रिटी बटाटा-टोमॅटोसारख्या भाज्यांची  शेती करतात. अलीकडेच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना या छंदाबद्दल सांगितलं आहे.
 
शिल्पा शेट्टी
अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता आणि तिच्या घराच्या बागेबद्दल सांगितलं ज्यामध्ये ती भाजीपाला पिकवत आहे. शिल्पा शेट्टी आपल्या घरात मातीविरहित बागकाम करते, ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामंथा रुथ प्रभू 
फॅमिली मॅन 2 फेम सामंथा सामंथा शाकाहारी आहार घेते. समंथा तिच्या स्वतःच्या घरात मायक्रोग्रीन वाढवते.


प्रिती झिंटा
अभिनेत्रीने काही काळापूर्वी तिच्या फॉर्मचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने सांगितलं होतं की ती अधिकृतपणे शेतकरी बनली आहे. प्रिती झिंटाचा तो व्हिडिओ तिच्या सफरचंद फॉर्मचा होता. सफरचंद व्यतिरिक्त स्ट्रॉबेरी, संत्री, पीच, पेरू आणि टोमॅटोचे पीक प्रीती आपल्या बागेत घेते.


सलमान खान
अनेकदा त्यांच्या शेतातील शेतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.