Shilpa Shetty Son Business: बॉलीवुडची अभिनेत्री  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ला कोण ओळखत नाही. शिल्पा शेट्टीचा वेगळा चाहता वर्ग आहे शिल्पा अभिनयासोबत तिच्या योगासाठी तितकीच प्रसिद्ध आहे. ती नेहमी योग करतानाचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली होती त्यावेळीसुद्धा तिने एक व्हिडीओ बनवला होता ज्यात ती योगा करत होती या व्हिडिओला सुद्धा प्रचंड पाहिलं गेलं आणि लाईक केलं गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा ने अभिनय करता करता बीजनएसमध्ये सुद्धा आपले पाय रोवले आहेत. शिल्पा शेट्टीचे स्वतःचे खूप हॉटेल्स आहेत आणि शिवाय तीचं युट्युब चॅनेल आहे आणि त्यावर ती योगाचे व्हिडीओ शेअर करत असते.


पण आता शिल्पाचा 10 वर्षाचा मुलगा (viyanshettykundra) याने नवीन बिजिनेस सुरु केला आहे आणि याबाबतीत त्याने स्वतः सोशल मीडियावर सांगितलं आहे  तो म्हणतो कि,कस्टमाइज शूज डिजाईन करण्याचं काम हाती घेतलं आहे आणि त्याने आपली आई म्हणजेच शिल्प शेट्टीचे शूज सुद्धा डिजाईन केले आहेत . 


वियानच्या या शूजच नाव  VRKICKS  असा ठेवण्यात आलं आहे  ज्याची किंमत 4999/- इतकी असणार आहे ,शिल्पा शेट्टी ने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे कि ''माझा मुलगा वियान ने एक नवीन बिजिनेस सुरु केला या शूजची कल्पना त्याची स्वतःची आहे शिवाय इतकंच नाही तर येणाऱ्या इन्कममधून काही हिस्सा चॅरिटी ला दान करणार असल्याचं सुद्धा तो म्हणतोय'' 


सध्या वियानच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे.वयाच्या 10व्या वर्षी  त्याने उचलेल्या या पावलांचं कौतुक करावं तितकं कमी आहे.