मुंबई : बॉलिवूड फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावरुन ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या विविध फोटोमुळे शिल्पाची सोशल मीडियावर चर्चा असते. पण आता शिल्पा एका वेगळ्याच व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये शिल्पा स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. पण या व्हिडिओसोबतच शिल्पाने तिला पोहता येत नसल्याचंही लिहिलंय. शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


शिल्पा स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याआधीदेखील शिल्पाचे फोटो, व्हिडिओ समोर आले. पण स्विमिंग पूलमधील व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पासोबत आणखी एक महिलाही दिसत आहे. शिल्पा वॉटर थेरेपीचा आनंद घेताना दिसतेय. शिल्पाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर त्याला कॅप्शनही दिलं आहे.