Shilpa Shetty Video: बॉलिवूड सुपरस्टार शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखले जाते. ती तिच्या सोशल मीडियावर व्यायामासंदर्भातील पोस्ट शेअर करत असते. तिच्या त्या सकारात्मक पोस्टमुळे तिचे चाहते नेहमीच प्रेरित होतात. तिनं अनेकदा योग साधनेमुळे तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी माध्यमांना सांगितले आहे. 47 वर्षांची असूनही शिल्पाचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. तिच्या आयुष्यात काही महिन्यांपासून उलाढाल सुरु होती तरी तिनं योगा करणे कधीच थांबवले नाही. पायाला झालेल्या दुखापतीमुळे गेल्या जवळपास 3 महिन्यांपासून व्हील चेअरवर बसलेल्या शिल्पाला तिचा व्यायाम आणि वर्कआऊट करता येत नव्हतं, पण आज गुरुपर्व निमित्त तिने सूर्यनमस्कार घालून याची सुरुवात केली. (Shilpa Shetty who was nailed to the bed is now doing yoga nz)


हे ही वाचा - बॉलिवूडमधील या कपलच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या



शिल्पानं व्हिडिओ केला शेअर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 महिन्यांपूर्वी शिल्पाला चालण्यासाठी कोणा न कोणाची मदत घ्यावी लागत होती पण आता शिल्पाच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता तिला चालता येत आहे. तिचा त्या काळात योगाशी फारसा संबंध आला नव्हता पण तिनं  आज एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शिल्पा सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सूर्यनमस्कार करताना शिल्पाने या व्हिडिओमध्ये एक प्रेरणादायी संदेशही शेअर केला आहे. शिल्पाने लिहिले - ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. निरोगी जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तीन महिन्यांनंतर मी सूर्यनमस्कार केला आणि ही अशी भावना आहे ज्याचे वर्णन करता येणार नाही.


हे ही वाचा - प्रेगनेन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...


 


शिल्पाचे व्हिडिओ लोकांना प्रेरणा देतात


शिल्पा शेट्टीचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहेत जे लोकांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करतात. ती अनेकदा तिचे असे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते, तर तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनलही आहे ज्यावर फक्त फिटनेस आणि आरोग्यदायी खाण्या-पिण्याचे व्हिडिओ शेअर केले जातात. याशिवाय शिल्पाने एक पुस्तकही लॉन्च केले आहे जे खूप फायदेशीर आहे.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हे ही वाचा - बाबो...! सिनेमापेक्षा करिनाच्या ड्रेसचं बजेट जास्त; कोट्यवधींचा ड्रेस पाहून तुम्हीही चक्रावून जाल



शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. तिच्या त्या पोस्टमुळे अनेकांना प्रेरित करत असते. तिचे काही व्हिडिओमध्ये तर मजेशीर असतात. ज्यामुळे ती प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करते.