मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला (Raj Kundra) गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अश्लिल चित्रपट बनवणं आणि प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने हि कारवाई केली आहे. राज कुंद्रा यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून कुंद्रा यांनीच कारस्थान रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.  कुंद्राला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर आपलं स्टेटमेंट जाहीर केलंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हो...गेले काही दिवस खूपच आव्हानात्मक होते.  खूप अफवा, आरोप झाले.  बरेच ट्रोलिंग... अनेक प्रश्न... फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही... मात्र मी आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि यापुढेही मी हे करणार नाही. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे... पण कृपया माझ्या वतीनं खोटे कोट देणं टाळा... 



पुढे शिल्पा म्हणाली, एक सेलिब्रिटी म्हणून मी हे तत्व पाळते की, कधीही तक्रार करू नका, कधीही समजावून सांगू नका... मी एवढंच म्हणेन की, चौकशी चालू आहे. माझा मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही सर्व कायदेशीर उपयांचा अवलंब करतोय...


' मात्र तोपर्यंत तुम्हाला एवढी विनंती आहे विशेषत: एक आई म्हणून, आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा. सत्यता पडताळल्याशिवाय अर्धवट माहितीवर टिपण्णी करू नका. मी गेल्या 29 वर्षापासून कायद्याचं पालन करणारी आणि एक मेहनती व्यवसायिक आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कधीही कुणाला निराश केलं नाही. सत्यमेव जयते...'