मुंबई : बिग बॉस सिजन ११ ची विजेती शिल्पा शिंदे आता सुनील ग्रोवरसोबत क्रिकेट बेस्ड कॉमेडी शो धना धन मध्ये काम करत आहे. या शोमध्ये सुनील-शिल्पाची जोडी लोकप्रिय ठरत आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. आता या दोघांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हम तुम सिनेमाच्या टायटल ट्रकवर रेन डान्स करताना पहा सुनील-शिल्पाचा रोमांटिक अंदाज...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा शिंदे रानी मुखर्जीप्रमाणे लाल रंगाच्या साडीत दिसली. या व्हि़डिओ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. बिग बॉस ११ मध्ये आल्यानंतर शिल्पा शिंदेची लोकप्रियता चांगलीच वाढली. बिग बॉसमध्ये अनेकदा वादात अडकलेली शिल्पा शिंदे हिना खानवर मात करुन अखेर विजयी ठरली.



कपिल शर्मासोबतच्या अनेक वादांनंतर अखेर सुनील ग्रोवरने स्वतंत्र शो सुरु केला. हा मजेशीर शो प्रेक्षकांना भावत आहे. तर या शोमध्ये शिल्पा शिंदेही प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.