मुंबई : बिग बॉसच्या घरी कायमच काही ना काही होत असतं. मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक सिझनमध्ये एक दिवस असा येतो की, एकमेकांशी सतत भांडणारे कंटेस्टंट इमोश्नल होताना आपल्याला दिसतात. बिग बॉस कायम प्रत्येक सिझनमध्ये आपल्या स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबियांशी भेटायला बोलवतात. मात्र त्यांना भेटण्याची संधी दिला जात नाही. असंच काहीस बिग बॉसच्या गुरूवारच्या एपिसोडमध्ये झालं आहे. जेव्हा घरात शिल्पाची आई तिला भेटायला येते. 


काय म्हणाली शिल्पाची आई?



आजच्या एपिसोडमध्ये शिल्पा शिंदेची आई आणि पुनीशचे वडिल त्यांना भेटायला आले आहेत. शिल्पाच्या आईची एन्ट्री ही अगदी इमोशनल होती. ती घरी येताच सगळ्यांशी खूप प्रेमाने बोलते. सगळ्यांची विचारपूस करून तुम्ही सगळे खूप छान खेळत आहात, असं त्यांचं कौतुक करते. मात्र कुणाला शिव्या देवू नका, भांडू नका असा गोड सल्ला देखील दिला. 



तसेच अर्शीशी बोलताना त्या म्हणाल्या की, तू शिल्पाला आईची जागा दिली आहे. चांगल आहे. आई बोलली आहेस तर हे नातं तस सांभाळ. तिला शिव्या नको देऊस. जगात आईची जागा खूप मोठी आहे. मला खूप छान वाटलं की माझ्या मुलीला आईची जागा मिळाली आहे. त्या आईची आई आहे मी. त्यानंतर शिल्पाच्या आईने सगळ्यांची माफी मागितली की, काही बोलण्यात चुकलं असेल तर माफ करा.