मुंबई : अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. नुकताच त्यांनी त्यांचा पहिला टिक-टॉक व्हिडिओ पोस्ट केला. 'प्यार तुझे करता हूँ देख मेरे आँखों में' या गाण्याच्या माध्यमातून शिव वीणा प्रती आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. 'बिग-बॉस'च्या घरात त्यांच्यात प्रेमाचं गुलाब फुललं आणि ते गुलाब बिग-बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अधिक बहरत असल्याचे दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे ते सध्या 'कश्मीर की वादियां' एन्जॉय करताना दिसत आहेत. हे दोघे नेहमी एकमेंकासोबत वेळ व्यतीत करताना दिसतात. बिग-बॉसच्या घरातील त्यांचं प्रेम हे टीआरपीसाठी असल्याची चर्चा वाऱ्यासारखी रंगली होती. परंतु त्यांनी ती फक्त चर्चा असल्याचे सर्वांना दाखवून दिले आहे. 



दरम्यान शिवच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वीणा त्याला एक गोड भेट दिली होती. तिने स्वत:च्या हातावर शिवच्या नावचा टॉटू काढला होता. त्यानंतर शिवनं देखील त्याच्या हातावर वीणाच्या नावाच्या टॉटू काढला आहे. 


सध्या हे प्रेमी युगूल कश्मीरमध्ये एन्जॉय करत आहे. त्या दोघांमधील प्रेम दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.