मुंबई : झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी 'या' मालिकेने जगभरात लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची भूमिका म्हटलं की, सळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे डॉ. कोल्हे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज या चित्रपटाचा 'टिझर' प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच त्यांचं चातुर्य, शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.


सध्या संपूर्ण राज्यात राजकिय वातावरण तापलेलं आहे. शिवसेना पक्षात उभी फुट पडलीय याच राजकिय नाट्याने राजकारण चांगलेच तापलंय अशातच जगदंबा क्रिएशनच्या "शिवप्रताप गरुडझेप" चा नवा टिझर लॉच करण्यात आलाय. शिवसेनेला बळ देणारा हा टीझर राजकिय घडामोडीवर चर्चा रंगवणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हेंच्या जगदंबा क्रिऐअशनकडून हा टिझर लॉच करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरही हा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलंय की, मराठी स्वाभिमानाचा अंगार... काल,आज आणि उद्याही.. शिवप्रताप - गरुडझेप...२०२२'' या सगळ्यानंतर अमोल कोल्हे शिवसेनेच्या मदतीसाठी धावुन आलेत का अशी चर्चा राजकिय वर्तृळात सुरु झालीये. या सिनेमाची निर्मिती अमोल कोल्हे यांनी केली आहे.