मुंबई : एका रिऍलिटी शोमधून वीणा जगताप आणि शिव ठाकरे या दोघांची ओळख झाली. पण अगदी एकमेकांसाठी बनलेल्या या दोघांची ही लवस्टोरी फक्त कार्यक्रमापुरतीच मर्यादीत न राहता या दोघांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. शिव आणि वीणा अनेकदा कार्यक्रमात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र भेटतात. वीणाने नुकतेच आपले इंस्टाग्राम अकाऊंट काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शिवने वीणाला दिल्या खास सरप्राईजचे फोटो आहेत. वीणा आणि शिव हे दोघेही या फोटोत अतिशय खूष दिसत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेली ही जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांना सोशल मीडियावर भरपूर पसंती आहे. एका रिऍलिटी शोमधून ओळख झालेले हे दोघं आपलं नातं फक्त शोपुरती मर्यादित ठेवतील असं साऱ्यांना वाटलं होतं.पण या दोघांनी आपल्या नात्याला खूप चांगल्या पद्धतीने जपलं आहे.


अलिकडेच शिवने वीणाला खास सरप्राईज दिलं आहे. यामध्ये शिवने गुलाबाच्या पाकळ्यांच्या घड्या घालून तिचं स्वागत केलं आहे. वीणासाठी त्याने घरभर फुलांची, फुग्यांची सजावट केली आहे. हे सरप्राईज वीणाला प्रचंड आवडल्याचं या फोटोंमधून दिसतंय.