`फर्जंद` सिनेमा एवढंच `शिवबा मल्हारी` हे गाणं सुपर हिट
नुकताच रिलीज झालेला मराठी सिनेमा, `फर्जंद` जेवढा लोकप्रिय होत आहे, तेवढंच या सिनेमाचं `शिवबा मल्हारी` हे गाणं सुपर हिट होत आहे.
मुंबई : नुकताच रिलीज झालेला मराठी सिनेमा, 'फर्जंद' जेवढा लोकप्रिय होत आहे, तेवढंच या सिनेमाचं 'शिवबा मल्हारी' हे गाणं सुपर हिट होत आहे. विशेष म्हणजे युवकांमध्ये हे गाणं प्रचंड लोकप्रिय होत आहे. मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं फर्जंद चित्रपटातील आहे, अंकित मोहन, अजय पुरकर, प्रवीण तार्डे, अस्ताद काळे आणि हरिश दुधाळे आणि प्रसाद ओक, सचिन देशपांडे यांनी हे गाणं गायलं आहे.
गाण्याची थिम केदार दिवेकर यांची आहे, तर हे गाणं फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक, दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं आहे. फर्जंद सिनेमा हा शिवकाळातील ऐतिहासिक घटनेवर आधारीत सिनेमा आहे. हा ऐतिहासिक सिनेमा मराठी चित्रपटातील मैलाचा दगड मानला जात आहे.