मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लागिरं झालं जी' मधून घराघरात पोहचलेली शितली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरने आता लवकरच सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शितलीची भूमिका शिवानीने इतकी सुंदर, सहज वठवली की अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेतून मनोरंजन केल्यावर आता ती 'युथट्युब' या सिनेमात झळकणार आहे. ३० नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


यावर आधारलेला सिनेमा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. सिनेमाच्या नावावरुनच हा सिनेमा तरुणाईवर आधारित असल्याचे कळते. तरुणाई आणि सोशल मीडिया यांच्यातील नाते सांगणारा हा सिनेमा आहे. 


नायक कोण?


सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन प्रमोद प्रभुलकर यांनी केले आहे. तर सायली पंकज, आर्या आंबेकर, सागर फडके आणि शिखा अजमेरा यांनी सिनेमातील गाणी गायली असून पंकज पडगण यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.
मात्र युथट्युब सिनेमात शिवानी बावकरचा नायक कोण असणार, हे अद्यापही कळलेले नाही. पण मालिकेतील शितलीची लोकप्रियता पाहता तिचे रुपेरी पडद्यावरील काम पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.