मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी 3' ची चर्चा आहे. शोमध्ये आता खरी स्पर्धा सुरू झाली असताना  शिवलीला पाटीलला घर सोडावं लागणार आहे. आठवड्याभरात घराबाहेर पडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. शिवलीला का घराबाहेर पडत आहे अशी चर्चा असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शिवलीला का घराबाहेर येत आहे याचं कारण समोर आलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या आदेशानुसार शिवलीला घर सोडणार आहे. ‘या आठवड्यातील नॅामिनेटेड सदस्या शिवलीला पाटील यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या काही काळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॅासच्या घराबाहेर असतील. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद असतील..' असं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. 



त्यामुळे  आता शिवलीला उपचारांनंतर पुन्हा कधी 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवलील घराबाहेर गेल्यानंतर शाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाने, सुरेखा कुडची, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे खेळणार आहेत..