मुंबई : 'झी मराठी ' वाहिनीवर प्रदर्शित होणारी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका आता अखेरच्या टप्प्यावर असतानाच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग दाखवू नये अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहास लपवता येत नाही. मात्र संभाजी माहाराजांचा ज्या प्रकारे छळ करुन त्यांना यातना दिल्या गेल्या, हे पाहणं आपल्याला शक्य होणार नाही त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखाही बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 


'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. राजकीय दबावामुले मालिका आवरती घेण्यात येत असल्याच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळाल्या होत्या. पण, मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनीह हे खोटं असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण,आता मालिकेला शिवसेना नेत्यांकडून होणारा विरोध आणि अखेरचे भाग न दाखवण्याची मागणी पाहता पुन्हा एक नवा वाद समोर येणार असं चित्र दिसत आहे. 


पाहा : डरकाळी! 'संभाजी नाही... छत्रपती संभाजी राजे म्हणायचं...' 



मालिकेत संभाजी महाराजांना औरंगाजेबाने कैद केल्याचं दाखवण्यात आलं आलं आहे. पण, कोणीही संभादीप्रेमी ही दृश्य यापुढे पाहू शत नाही. त्यामुळे झी मराठी वाहिनी आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करत त्यांनी मालिकेचा पुढील भाग वगळण्याचीच बाब समोर ठेवली आहे. खोतकर यांच्या या मागणीवर पुढे कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.