कोलकाता :  पश्चिम बंगालमधील बिजॉयगढ येथे एका २६ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. खुद्द अभिनेत्रीनच याबाबतची माहिती देत सदर घटनेविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्रीनं पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अभिनेत्रीची वैद्यकिय तपासणी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार ५ जुलै रोजी अभिनेत्रीच्या घरी तिच्याच ओळखीचा एक व्यक्ती आर्थिक मदत मागण्यासाठी आला.
पोलिसांना दिलेल्या माहितीत अभिनेत्रीने ती घरात एकटी होती असं सांगितलं. ज्यानंतर अभिनेत्रीला एकटं पाहून त्या व्यक्तीने त्याने विनयभंग केला. एवढंच नाही तर त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं म्हटलं जात आहे. इतक्यावरच न थांबता या घटनेची माहिती मिळाल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्या व्यक्तीनं दिल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणून या अभिनेत्रीनं कोलकात्याची वाट धरली. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीशी तिचे एकेकाळी चांगले नातेसंबंध होते. पण, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात तेढ निर्माण झाली. यादरम्यानच्या काळात त्या व्यक्तीनं अभिनेत्रीला संपर्क साधत तिला भेटण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याच्या मागणीला नकार देणाऱ्या या अभिनेत्रीनं त्याला आर्थिक मदत करण्यासाठी म्हणून घरी बोलावलं होतं ही बाबसुद्धा आता उघड होत आहे. 


 


अभिनेत्रीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३७६/५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची चौकशीही सुरु करण्यात असून, आरोपी एक व्यावसायिक असून अभिनेत्रीच्या परिचयातील आहे. किंबहुना अभिनेत्रीशी त्याचे यापूर्वी प्रेमसंबंध असल्याचीही माहिती उघड होत आहे.