मुंबई : एका अतिशय धक्कादायक घटनेनं कलाजगताला हादरा बसला आहे. 2014 मध्ये 'मिस इंडिया अर्थ' हा किताब जिंकलेल्या मॉडेल, अभिनेत्रीची शस्त्राचा धाक दाखवत लूट करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री आहे अलंकृता सहाय (alankrita sahai). तिच्या चंदीगढ येथील भाडेतत्वावर राहत असणाऱ्या घरात ही घटना घडली. जिथं चोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत पैसे लंपास केले. या घटनेनंतर अलंकृतानं पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. मंगळवारी ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. 


मास्क घातलेले तिघेजण मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या तिच्या घरात बळजबरीनं घुसले. ज्यानंतर त्यांनी अलंकृताला धाक दाखवत तिला डांबून ठेवलं आणि चोरी केली. अलंकृतानं दिलेल्या माहितीनुसार तिच्या घरातून 6 लाख रुपयांची रक्कम या चोरांनी लंपास केली. ज्यानंतर तक्रार दाखल होताच या प्रकरणाचा तपास करण्यात आला. 



माध्यमांशी संवाद साधताना अलंकृतानं दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच तिनं घरासाठी नव्या फर्निचरची खरेदी केली होती. रविवारी हे फर्निचर घरी पोहोचलं होतं. ज्यानंतर तिनं शंका व्यक्त केली आहे की चोरांपैकी कोणीतरी त्या दिवशी फर्निचर पोहोचवणाऱ्यांमध्येच असावा. तिचं एटीएम कार्डही चोरांनी नेलं ज्यातून 50 हजार रुपयांची रक्कम काढल्यानंतर त्यांनी ते परत केलं. पालक 10 दिवसांसाठी बाहेर गेल्यामुळं अलंकृता एकटीच घरी होती.