COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सिगरेट ओढणे हे शरीरासाठी घातक असतं. पण अनेकदा कामाच्या निमित्ताने कलाकारांना सिगरेट किंवा दारू यांच सेवन करावं लागतं. पण जेव्हा ती गोष्ट सिनेमाच्या निमित्ताने शिकावी लागते तेव्हा तो एक वेगळा अनुभव असतो. अनेकदा कलाकारांना आपला अभिनय जीवंत वाटावा यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेल्या ‘राजी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावल्यावर आता अभिनेत्री अमृता खानविलकर ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज’ ह्या वेबसीरीजच्या माध्यमातून डिजीटल दूनियेत पाऊल ठेवतेय.


राजीमध्ये मुनिरा ह्या एका पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या सोज्वळ रूपात दिसलेली अमृता आता डॅमेज ह्या वेबसीरिजमधून बोल्ड, ब्युटिफुल आणि सेन्शुअस लविनाच्या रूपात दिसणार आहे. सूत्रांनुसार, ह्या बिंधास्त, बेपरवाह लविनाच्या भूमिकेला न्याय देताना अमृताला सिगरेट प्यायची होती. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सिगरेटला कधीही हात न लावणारी अमृता भूमिकेची गरज म्हणून सिगरेट ओढायला तयार तर झाली. पण तिला ते काही जमत नव्हतं.



डॅमेज वेबसीरिजच्या युनिटकडून कळतं की, सिगरेट पकडण्यापासून ते एखाद्या व्यसनीमाणसाप्रमाणे सिगरेट ओढण्यासाठीचा सराव अमृताला चांगलाच महागात पडला. तिने ह्या शुटिंगच्या दरम्यान एके दिवशी 40 सिगरेट ओढल्या. आणि त्यामूळे नंतर तब्बल दोन आठवडे तिच्या तोंडातून आवाज निघणेच कठीण झाले होते. 


अमृता ह्याविषयी सांगते, “मला सिगरेटच्या वासानेही मळमळतं. माझ्या आसपास कोणी सिगरेट ओढत असेल तर मी लगेच त्या व्यक्तिला रागावते. अशावेळी मनोरूग्ण लविनाची भूमिका रंगवताना मलाच सिगरेट ओढणं भाग होतं. सिगरेट पिणं भूमिकेचा अविभाज्य हिस्सा असल्याने मी तयार झाले खरी, पण मला सिगरेट ओढणं जमेच ना.