मुंबई : चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेले भारत गणेशपुरे. भारत गणेशपुरे दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. लग्नसराई सगळीकडे असताना भारत गणेशपुरेंच्या लग्नाची बातमी आली आणि चाहत्यांना एकच धक्का बसणार आहे. कारण चला हवा येऊ द्याच्या मंचावर भारत गणेशपुरेंच लग्न झाल्याच ऐकलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर बातमी अशी आहे की, भारत गणेशपुरे आपल्या पहिल्याच बायकोशी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. अजब वाटलं ना? पण हेच खरं आहे. भारत गणेशपुरे यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि भारत आता आपल्या पहिल्या बायकोसोबतच लग्न करत आहे. 



यामुळे केलं दुसऱ्यांदा लग्न


झालं असं की,  एका भविष्यकारानेच भारत गणेशपुरेंना पत्नीसोबत पुन्हा एकदा सप्तपदी घालण्याचा सल्ला दिला आहे. नुकत्याच एका परदेश दो-यात भारत गणेशपुरेंना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तिथेच तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्यांच्यावर हृद्यविकाराची शस्त्रक्रिया करावी लागली होती. या संकटामुळे संपूर्ण गणेशपुरे कुटुंब हादरुन गेलं होतं.भारतचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे त्याने भारतात आल्यावर लगेचच ज्योतिषींची भेट घेतली होती. त्यावर ज्योतिषींनीच त्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच आज भारत पुन्हा एकदा पत्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 


‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या निमित्ताने घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे भारत गणेशपुरे. आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे भारत आज पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत.  भारत गणेशपुरे यांचं १८ वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे आणि एक मुलगासुद्धा आहे. गोरेगाव इथल्या त्यांच्या राहत्या घरीच हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडणार आहे. भारत गणेशपुरे यांची हळद कालचं पार पडली..श्रेया बुगडेने त्यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.