मुंबई : बिग बॉस फेम अर्शी खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक फॅन चक्क तिला किस करताना दिसत आहे. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे अर्शी खानला खूप मोठा धक्का बसला आहे. एअरपोर्टवर अर्शी खान स्पॉट झाल्यावर हा प्रसंग घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शी खानने यावेळी काळ्या रंगाचा सूट घातला आहे. ज्यामध्ये तिने डोक्यावर एक दुप्पटा घेतला आहे. व्हिडिओमध्ये अर्शी बोलताना दिसत आहे. आज रमजान असल्यामुळे मी खास तयार झाली आहे. 


चाहत्याने केलं अर्शी खानला KISS 



एका चाहत्याने एअरपोर्टवर अर्शी खानला सेल्फीकरता रिक्वेस्ट केली. अर्शीने त्याच्यासोबत सेल्फी क्लिक केला आणि सेल्फी घेतल्यानंतर अचानक त्या चाहत्याने अर्शीच्या हातावर किस केलं. ज्यानंतर अर्शी खूप शॉक झाली आहे. 


दोनवेळा बिग बॉसमध्ये सहभागी 


अर्शी खानने दोन वेळा बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे. पहिल्यांदा ती बिग बॉस 11 मध्ये आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉस 14 मध्ये ती सहभागी झाली. अर्शी खानने सगळ्यांना मोठं चॅलेंज दिलं होतं. विकास गुप्तासोबत होणारा तिचा वाद खूप चर्चेत होता. 


अर्शी शो विश आणि सावित्री देवी कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दिसली आहे. अर्शीने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, आता मी माझ्या अभिनय करिअरवर फोस करत आहे. याबद्दल जास्त जाणून घेत आहे. एक दिवस मी सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करत आहे.