धक्कादायक! अखेर इम्रान हाशमी स्वत:हून #MeToo वर म्हणाला...
पहिल्यांदाच बोलला इमरान हाशमी
मुंबई : तनुश्री दत्ताने #MeToo च्या अंतर्गत नाना पाटेकर यांच्या विरोधात बोलून बॉलिवूडमध्ये एकच गोंधळ निर्माण केला. तनुश्रीचं असं देखील म्हणणं होतं की, तिने "आशिक बनाया आपने" यासारख्या सिनेमात बोल्ड सीन देऊन खूप मोठी चूक केली. या सिनेमानंतर तिची इमेज अशीच झाली. त्यानंतर सतत तिला बोल्ड सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या.
आता पहिल्यांदाच #MeToo प्रश्नावर अभिनेता इमरान हाशमीचं वक्तव्य समोर म्हणणं आलं आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, प्रोडक्शन हाउस आणि सेटवर महिलांच्या सुरक्षेचा विचार करता काही नियमावली बनवली गेली पाहिजे. पुढे इमरान म्हणतो की, लैंगिक अत्याचाराला आता सहन करू शकत नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गाइललाइन असणं आवश्यक आहे. आमचं प्रोडक्शन याबाबत काळजी घेतं जर कुणासोबत काही चुकीचं झालं तर ते कायदेशीर कारवाई करतात. फक्त ही सुरूवात आहे आणि ही होणे गरजेची आहे.
पुढे तो म्हणाला की, MNCs मध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक नियम पहिल्यापासूनच आहेत आता बॉलिवूडमध्ये देखील असे नियम करणे गरजेचे आहेत. #MeToo या चळवळीला खूप अगोदर सुरू व्हायला हवं होतं. परदेशात या अभियानाला गेल्यावर्षी सुरूवात झाली आणि अगदी एका तासात महिलांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. पुढे इमरान म्हणाला की, इंटीमेट सीन करताना मी खूप काळजी घेतो. हे सीन करताना मी ज्या व्यक्तीसोबत किसिंग सीन करायचा आहे त्या व्यक्तीशी खूप बोलतो. एकमेकांचा कम्फर्ट झोन पाहतो. जर को स्टार या इंटिमेट सीनकरता कम्फर्टेबल नसेल तर मी ते अजिबात करत नाही.