मुंबई : मनोरंजन विश्वातील एका मोठ्या स्टारने या जगाचा निरोप घेतला. प्रसिद्ध कोरिओग्राफरला कोरोना झाला होता आणि ते बराच काळ उपचार घेत होता. ज्याने लोकांना स्वतःच्या तालावर नाचवले तो स्वतःच आज जीवनाची लढाई हरला. अनेक स्टार्सनीही या कोरिओग्राफरला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही त्याचा काहीही फायदा झाला नाही. तो आयसीयूमध्ये होता ज्यानंतर त्याने उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय पुरस्कार विजेते नृत्यदिग्दर्शक के शिवशंकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चित्रपटसृष्टीत तसेच त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. के शिवशंकर हे ७२ वर्षांचे होते. त्यांना काही काळापासून कोविड-19 ची लागण झाली होती आणि त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू होते. त्यांना हैदराबाद येथील आयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते.


सोनू सूदचे ट्विट


सोनू सूदने तेलगू चित्रपटांचे प्रसिद्ध कोरिओग्राफर शिव शंकर (के शिवशंकर) यांच्या निधनावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले: 'शिवशंकर मास्टर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावले. आम्ही त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण देवाची दुसरी योजना होती. मास्टरजी तुमची सदैव स्मरणात राहिल, ईश्वर त्यांच्या कुटुंबाला हे नुकसान भरून काढण्याची शक्ती देवो. चित्रपट सदैव तुमची आठवण ठेवेल सर.


राजामौली यांचे ट्विट


सोनू सूद व्यतिरिक्त बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी शिव शंकर (के शिवशंकर) यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले: 'शिवशंकर मास्टर गुरू यांचे निधन झाले हे जाणून दुःख झाले. मगधीरा या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणे हा एक संस्मरणीय अनुभव आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.


सोनू सूद मदत करत होते


कोरोनाची लागण झाल्यानंतर शिव शंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर सोनू सूद त्याच्या मदतीसाठी पुढे आला. सोनू सूदशिवाय अभिनेता धनुषही शिवशंकर यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्यानेही आर्थिक मदत केली. शिवशंकर यांनी नृत्यदिग्दर्शनाव्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम देखील केलं आहे