मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने विकी कौशलसोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोंचा आजही सोशल मीडियावर बोलबाला आहे. पण या सर्वांमध्ये एका बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे, ज्याची सर्वांनाच कल्पना होती पण या बातमीच्या पुष्टीची प्रतीक्षा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नात अनेकजण ज्या खान कुटुंबाला शोधत होते. त्यांचे या लग्नाला न येण्यामागचे कारण समोर आले आहे. समोर आलेल्या या कारणमुळे खान कुटुंबातील एकही व्यक्ती कतरिना-विक्कीच्या लग्नाला पोहोचली नाही.


सलमान खान आणि कतरिना कैफची भेट ज्या व्यक्तीने केली ती त्याची धाकटी बहीण अर्पिता खान होती हे सर्वांनाच माहीत आहे. अर्पिता आणि कतरिना कैफ यांच्यात खूप घट्ट मैत्री असल्याचं म्हटलं जातं.


पण कुटुंबाच्या इतक्या जवळ असूनही जेव्हा कतरिनाच्या लग्नात कोणीही दिसले नाही तेव्हा लोकांना खूप आश्चर्य वाटले. आता अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यामागचे कारण जाणून घ्यायचे होते. आणि यामागचे कारण खान कुटुंबाचा जावई आयुष शर्माने उघड केले आहे. आयुषने सांगितले की, कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचे आमंत्रण त्याला आले नव्हते. होय, कतरिना कैफच्या वतीने, तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला मिसेस कौशलने आमंत्रित केले नव्हते.


आयुष एका मुलाखतीत म्हणाला की - कतरिना कैफ आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही सर्व तिला तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, तिला तिचे लग्न तिच्या जवळच्या लोकांमध्ये साजरे करायचे होते आणि ही काही मोठी गोष्ट नाही. हा तिचा आणि विकीचा मोठा दिवस आहे आणि त्यांनी हा दिवस आनंद घालवायला हवा इतकंच.


आयुष पुढे म्हणतो - "कतरिना आमच्यासाठी नेहमीच कुटुंबातील सदस्यासारखी राहिली आहे आणि ती आनंदी आहे याचा आम्हाला आनंद आहे. आयुष शर्माच्या मुलाखतीनंतर चाहत्यांना प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. खान कुटुंबीयांच्या लग्नाला उपस्थित न राहण्याचे गूढही चाहत्यांसमोर आले आहे."