मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी मालिका ठरली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. मालिकेमुळे प्रत्येकाला नवी ओळख मिळाली.  सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये चांगली कमाई करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मालिका टीआरपी शर्यतीत अव्वल क्रमांकावर असते. दिवसेंदिवस येणाऱ्या रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत. कलाकारांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत जात आहे. 


या मालिकेत आईचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही कायमच चर्चेत असते. मात्र आता मधुराणी प्रभुलकर ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मधुराणी प्रभुलकर आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाली आहे. ऑनलाईन माध्यमातून हॉटेल बुकींग करताना ही फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.


नेमकं प्रकरण काय आहे?
रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल मध्ये अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आणि तिचे पती दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर  त्यांनी बुकींग केले होतं गणपतीपुळे येथे दोन दिवसांसाठी त्यांनी १७ हजार रुपये देऊन त्यांनी या रिसॉर्टचे बुकींग केलं होतं. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


ग्रीनलीफ रिसॉर्टमध्ये बुकींग केल्यानंतर मधुराणी प्रभुलकर आणि तिचे पती त्या ठिकाणी राहण्यासाठी गेले होते. मात्र तिकडे गेल्यानंतर त्यांच्या नावाने कोणतंही बुकींग झाली नसल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी हॉटेलच्या मॅनेजमेंटकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप प्रमोद प्रभुलकर यांनी केला आहे.


हे रिसॉर्ट ४ स्टार दर्जाचे असून ते शिवसेना नेते रविंद्र फाटक यांचे असल्याचे बोललं जात आहे. एका नेत्याच्या रिसॉर्टमध्ये फसवणूक झाल्याने मधुराणी प्रभुलकर यांना मोठा धक्का बसला आहे.


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलमध्ये लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. त्यात आता अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आणि त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.