मुंबई : करीना कपूर ही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक हीट चित्रपट केले आहेत. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु सध्या करिना कपूरची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एक धक्कादाय माहिती समोर येत आहे की, करीच्या जवळच्या व्यक्तीने गाझियाबादमध्ये आत्महत्या केली आहे. 11 व्या मजल्यावरुन उडी मारली, ज्यानंतर तिला जवळील रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुषी दीक्षित असे या मुलीचे नाव आहे. घटनेच्या वेळी तिची आईही फ्लॅटमध्ये होती. 25 वर्षीय आयुषी रात्री 8 च्या सुमारास फ्लॅटच्या बाल्कनीत आली. तिथे खुर्ची ठेवून त्यावर चढून तिने रेलिंगवरून उडी मारली. मोठा आवाज ऐकून आई बाल्कनीत आली. तिने खाली बघितल्यावर जे पाहिलं, त्यानंतर ती बेशुद्ध पडली.


आजूबाजूच्या लोकांनी लगेच आयुषीचे वडील आणि पोलिसांना याची माहिती दिली. ज्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.


ही घटना नंदग्राम भागातील राजनगर एक्स्टेंशनमध्ये असलेल्या KW ऋषी सोसायटीतील आहे. मेरठमधील कंकरखेडा येथे राहणारे सतीश दीक्षित यांचे कुटुंब या सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक-1101 मध्ये राहते. सतीश दीक्षित यांचा मेरठ रोडवर नमकीन कारखाना आहे.


त्यांची मुलगी आयुषी नोएडा येथील गौरव स्टुडिओमध्ये फॅशन डिझायनर आहे. गौरव हा देशातील एक नामांकीत डिझायनर आहे. येथे काम करत असताना आयुषीने यापूर्वी अभिनेत्री करीना कपूरसाठीही ड्रेस डिझाइन केले होते. प्रोजेक्ट्सदरम्यान करिना आणि आयुषी एकमेकांना कामासाठी भेटले होते.



सुसाईड करताना आयुषीने नोटमध्ये लिहिले- पापा तुमच्या राजवटीत कोणीही सुखी राहू शकत नाही
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आयुषीची खोली तपासली. तेथे दोन पानी सुसाईड नोट त्यांना सापडली. नंदग्राम पोलिस स्टेशनचे प्रभारी अमित काकरन यांनी सांगितले की, सुसाईड नोटमध्ये आयुषीने नोकरीच्या तणावाबाबत लिहिले आहे. तसेच तिच्या वडिलांमुळे देखील तिनं हे पाऊल उचललं.


तिने वडिलांबाबत लिहीले की, 'पप्पा, तुमच्या राजवटीत कोणीही सुखी होऊ शकत नाही.' परंतु तिने असं का लिहिले आहे? हे अद्याप कळलं नाही, ज्यामुळे पोलिस तिच्या घरच्यांची चौकशी करत आहेत. परंतु असं लिहिण्या मागे आयुषीचा काय हेतू होता, हे अद्याप पोलिसांना कळले नाही.