परिस्थिती काय दिवस दाखवते...; आघाडीची मॉडेल आज सुपर मार्केटमध्ये शोधतेय काम
सुपर मार्केटच्या बिलिंग काऊंटरवर दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका
मुंबई : परिस्थिती कोणाला काय दिवस दाखवेल, याचा काहीच नेम नाही. त्यामुळं आयुष्यात कायमच परिस्थितीला स्वीकारण्याची कला अंगी बाणवा. संकटाच्या वेळी त्रास कमी होईल. जीवनातील अशाच परिस्थितीला एक लोकप्रिय मॉडेल सामोरी गेली. कधी एकेकाळी फॅशन आणि मॉडेलिंग विश्वात ज्या नावाचा बोलबाला होता तेच नाव आता मात्र दिसेनासं झालं.
सुपरमॉडेल असणाऱी ही सौंदर्यवती आता गरिबीच्या दिवसांचा सामना करत आहे. Marlon Brando, Warren Beatty आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इमरान खान यांची भेट घेतल्यामुळं चर्चेत आलेली ही मॉडेल आहे Marie Helvin.
मेरी, सध्या 69 वर्षांच्या आहेत. आर्थिक चणचण जाणवत असल्याचमुळं त्या सुपर मार्केटमध्ये नोकरी शोधण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या परिस्थितीबाबत सांगताना त्यांनी सर्वच गोष्टी समोर आणल्या. (shocking news once a famous model marie helvin now works in super market)
'मी आता स्वत:च्याच बळावर जगत आहे. मला नाही ठाऊक येत्या काळात काय घडेल. कारण कोरोना महामारीच्या काळात मी साठवलेले सर्व पैसे खर्च केले. आता मात्र मी घरी जाण्याचा विचार करत आहे', असं सांगत हवाईला जाण्याची वेळ आल्यास तिथं मी सुपरमार्केटमध्येही काम करेन असं त्यांनी सांगितलं.
Duchess of Cornwall's च्या भावासोबत होतं अफेअर
मेरीचं लग्न David Bailey या फोटोग्राफरशी झालं होतं. पण, 1958 मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मेरीला, 100,000 Franc (भारतीस चलनानुसार 81,67,670 रुपये) मिळाले होते. यानंतर तिनं कधीच लग्न केलं नाही.
Duchess of Cornwall's चा भाऊ, Mark Shand याच्यासोबत मात्र ती चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. पण, 2014 मध्ये मार्क यांचं एका अपघातात निधन झालं. त्याचं जाणं, मेरीला हादरा देऊन गेलं. त्यांच्या निधनासाठी तिनं स्वत:ला दोष दिला.
मेरीनं एक काळ गाजवला होता. तिच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांची संख्या जास्त होती. आपल्या या सौंदर्याचं गुपितही तिनं उघड केलं. वर्षातून दोनदा तिनं आपण बोटोक्स करत असल्याचा खुलासा केला. मुळची हवाईची असणारी मेरी सध्या लंडनमध्ये आहे.