मुंबई : हटके विषयांवर सिनेमा बनवणारा दिग्दर्शक म्हणून दिबाकर बॅनर्जीला ओळखलं जातं. 21 जून 1969 रोजी दिल्लीत यांचा जन्म झाला. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी स्क्रीनरायटर आणि प्रोड्यूसर देखील आहेत. एवढंच काय तर सिनेमांत येण्याअगोदर या दिग्दर्शकाने अॅड वर्ल्डमध्ये भरपूर काम कमावलं आहे. दिबाकर बॅनर्जीची स्वतःची प्रोडक्शन कंपनी असून दिबाकर बॅनर्जी प्रोडक्शन असं नाव दिलं आहे. या दिग्दर्शकाने भरपूर लोकप्रियता मिळवली पण कास्टिंग काऊचमध्ये त्याच नाव पुढे आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतून मुंबईत येणाऱ्या दिबाकरने एक टीव्ही शो शूट केलं. यामध्ये त्याने 'खोसला का घोसला' बनवण्याचा विचार केला याकरता त्याने अभिनेता अनुपम खेरसोबत बोलणं केलं. अनेकांनाकडून प्रशंसा झालेल्या या दिग्दर्शकाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पहिल्याच सिनेमांतून प्रकाशझोतात आलेल्या या दिग्दर्शकाने 2008 मध्ये ओए लकी - लकी ओ या सिनेमाची निर्मिती केली. आणि हा सिनेमा देखील सुपरहिट ठरला असून याला देखील राष्ट्रीय सन्मान मिळाला. लव, सेक्स और धोका, शंघाई आणि ब्योमकेश बक्शी ही देखील महत्वाची सिनेमे आहेत. 


एवढा लोकप्रिय असूनही दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीचं नाव 2011 मध्ये चर्चेत आलं त्याला कारण वेगळं होतं. 2011 मध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने दिग्दर्शकावर कास्टिंग काऊचचा आरोप लावला होता. पायलचा असा आरोप होता की, दिबाकरने सिनेमात रोल देण्यासाठी शारीरिक संबंधाकरता दबाव आणला होता. पायलच्या म्हणण्यानुसार, शंघाई सिनेमांत रोल करण्यासाठी तिने दिग्दर्शकाशी बोलणं केलं. त्यांनी मला कास्टिंग डिरेक्टरशी बोलण्यास सांगितलं. मी त्यांना भेटले ऑडिशन देखील माझं चांगल झालं. ऑडिशन झाल्यावर मी दिबाकर यांना फोन करून सांगितलं. ते माझ्या घरी आले आणि माझं वजन वाढलं असं सांगत. मला शर्ट वर करून पोट दाखवायला सांगितलं. मला ही गोष्ट आवडली नाही. मी दिबाकर यांना माझा मस्करीचा मूड नसल्याच सांगितलं. मी त्यांना माझ्या घरातून जायला सांगितलं आहे.