मुंबई : 'पद्मावत' या सिनेमात खिलजीची भूमिका साकारणारा रणवीर सिंह सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रत्येकाला रणवीर सिंहला आपल्या सिनेमांत कास्ट करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. रणवीर सिंह सध्या रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' मध्ये बिझी आहे. अशी चर्चा आहे की, रणवीर सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूरसोबत एका सिनेमात लवकरच दिसणार आहे. मात्र आता अशी बातमी आली आहे की, रणबीर कपूर देखील या सिनेमात असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरने करिना आणि आलियाशी संपर्क केला होता. आणि या दोघींनी होकार सुद्धा दिला. सिनेमांत करिना कपूर सिनेमात आलिया भट्टच्या बहिणीचा रोल करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर या सिनेमासाठी रणवीर सिंह आणि रणबीर कपूर या दोघांची निवड करण्याचा विचार करत होता. मात्र रणबीर कपूरने या सिनेमासाठी नकार दिला आहे. 


असं म्हटलं जातं की, रणबीरने सुरूवातीला या सिनेमासाठी तयारी दाखवली होती. मात्र नंतर त्याने या सिनेमात काम करण्यास नकार दिला. या सिनेमात रणवीर आणि रणबीरला दोन भावांची भूमिका साकारायची होती. रणबीरने या सिनेमाला नकार दिल्याची 2 कारणे म्हटली जात आहेत. एक तर त्याला नकारात्मक मिळालेली भूमिका आणि या सिनेमात असलेले 2 हिरो. या कारणांमुळे रणबीरने सिनेमाला नकार दिला आहे. 


आता करण जोहरने दुसऱ्या हिरोचा शोध सुरू केला आहे. दुसऱ्या हिरोकरता वरूण धवनच नाव समोर आलं आहे. करण जोहरा दुसरा हिरो म्हणून अशा हिरोचा शोध घेत आहे जो रणवीर सिंहच्या वयाचा असेल.