मुंबई : Samantha Ruth Prabhu आणि Naga Chaitanya ही दाक्षिणात्य कलाविश्वातील एक अत्यंत लोकप्रिय जोडी होती. अतिशय थाटामाटाक या दोघांनी लग्नगाठ बांधली. किंबहुना रिलेशनशिपच्या दिवसांपासूनच त्यांनी सर्वांना कपल गोल्स दिल्याचं पाहाय़ला मिळत होतं. मग असं नेमकं काय झालं, ज्यामुळे त्यांनी थेट घटस्फोटाचाच निर्णय घेतला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या क्षणाला नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटाची अधिकृत माहिती समोर आली तो क्षण चाहत्यांना धक्का देणारा होता.  


अतिशय अनपेक्षितरित्या या जोडीमध्ये आलेला हा दुरावा पचवणं अनेकांनाच कठीण गेलं. त्याहूनही त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या बहुविध चर्चांनी या प्रकरणाला एक वेगळं वळण दिलं. 


आता म्हणे या घटस्फोटामागचं अतिशय महत्त्वाचं आणि तितकंच मोठं कारण समोर आलं आहे. हे कारण आहे समंथाचे काही निर्णय. 


सूत्रांच्या माहितीनुसार 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रंगस्थलम' या चित्रपटात समंथानं राम चरणसोबत एक लिप लॉक सीन दिला होता. 


लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांनंतर तिचा हा चित्रपट आला होता. पण, या सीननं तिच्या वैवाहिक जीवनाचा पाया काहीसा हलवला. 


राम चरणसोबतच्या या सीनमुळे तिची खिल्लीही उडवण्यात आली होती. The Family Man 2' च्या वेळीही असंच काहीसं झालं. 


वेब सीरिजमध्ये तिनं एक इंटिमेट सीन दिला होता. नागा चैतन्यच्या सिद्धांतांच्या विरोधातच ही बाब होती. परपुरुषाशी तिची इतकी जवळीत नागा चैतन्यला रुचत नव्हती. 


चित्रपट, सीरिजच्या निमित्तानं बोल्ड सीन करत राहण्याचा, आयटम साँग्समध्ये परफॉर्म करण्याचा समंथाचा निर्णय फक्त नाका चैतन्यच नव्हे, तर त्याच्या कुटुंबीयांनाही खटकत होता. 


The Family Man 2 मधील इंटिमेट सीन चैतन्यच्या कुटुंबीयांनी पाहिला आणि तिथेच नात्यात मोठं वादळ आलं. सीरिजमध्ये असा कोणता सीन आहे, याची कल्पना तिनं कुटुंबाला दिली नसल्यामुळे आपला विश्वासघात झाल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन गेली. 


रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत घालवायची होती संध्याकाळ, पण त्या व्यक्तीमुळे....


 


पुढे गोष्टी अशा काही बिनसल्या की ज्याचे परिणाम घटस्फोटाच्या रुपात समोर आले.