मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे रिलेशन कोणापासूनही लपलेले नाहीत. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सर्वांशी बोलतात. ऐवढेच काय तर ते मीडियासमोर देखील एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करतात. ते जवळ-जवळ घरच्या सगळ्याच कार्यक्रमात एकत्र असतात. ज्यामुळे ते दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकतील अशी सर्वांसोबत चर्चा सुरु आहे. यावर दोघांपैकी कोणीही काही वक्तव्य केलं नव्हतं. परंतु आता अर्जून कपूरने आपल्या लग्न संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ज्यानंतर सर्वत्र जोरदार चर्चा होऊ लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच काय तर यानंतर मलायका आणि अर्जून दोघेही ट्रेंड होऊ लागले आहेत.


खरंतर त्यांच्या जवळच्या लोकांकडून ते लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले, एवढेच काय तर अनेक जण हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु आता डिसेंबर जवळ येत असतानाच आयत्यावेळी अर्जून कपूर काही वेगळंच म्हणतोय.


इंस्टाग्रामवर अर्जुन कपूरने लग्नाच्या बातम्यांचे खंडन केले आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, "माझ्या आयुष्याबद्दल माझ्यापेक्षा प्रत्येकाला जास्त माहिती आहे हे मला आवडले."


विशेष म्हणजे अर्जुन आणि मलायका अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक मुलाखतींमध्ये दोघांनीही त्यांच्या प्रेमळ नात्याचा स्वीकार केला आणि त्याबद्दल बोलले आहेत.


सोशल मीडिया स्टार जेनिस सिक्वेराशी झालेल्या संभाषणात अर्जुनने खुलासा केला की, मलायकाचा आदर असल्याने त्याने सर्वांसमोर हे नाते स्वीकारले. लोकांनी तुमच्या नात्याबद्दल काहीही अंदाज बांधावा आणि लिहावे असे नाही.


याआधी एका मुलाखतीत अर्जुन म्हणाला होता की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत नाही, कारण मला वाटते की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे. त्यांचाही भूतकाळ आहे. अभिनेता म्हणाला की मी देखील अशा टप्प्यातून गेलो आहे, जेव्हा सर्व काही सार्वजनिक होते. हे नेहमीच खरे नसते कारण मुलांवर देखील याचा परिणाम होतो.


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेकदा व्हेकेशनमध्ये एकत्र मस्ती करताना दिसतात. मलायकाच्या बेडरूममध्ये तिचा आणि अर्जुनचा एक फोटोही आहे, जो काही दिवसांपूर्वी मलायकाने शेअर केला होता.


दोघांच्याही चाहत्यांना पसंती मिळत आहे आणि आता लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले आहे.