मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने कोणत्याही पात्राशी तडजोड केलेली नाही. त्यामुळेच तिचा अभिनय लोकांना आवडतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुम्हाला सांगतो की, काही कलाकार त्यांचं वजन बदलून चित्रपट शोधत असतात. त्याचबरोबर आता अभिनेत्री राधिका आपटेने देखील असं काही केलं आहे की जे, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.


राधिकाने या अभिनेत्याला डेट केलं आहे
आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्री राधिका आपटे कधीही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही शेअर करत नाही. त्याचबरोबर, अभिनेत्रीने एका परदेशी मुलाशी लग्न केलं आहे. वृत्तांवर विश्वास ठेवायचं झाला तर अभिनेत्रीचं बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरसोबत रिलेशशिमध्ये होती. 


वास्तविक राधिका 'शोर इन द सिटी' या चित्रपटात तुषार कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. त्याचबरोबर दोघांची जवळीकही खूप वाढली होती. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. याशिवाय राधिका आपटे प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचीही क्रश आहे.


राधिकाच्या कुटुंबीयांची इच्छा नव्हती की तिने अभिनेत्री व्हावं
रिपोर्ट्सनुसार, राधिका आपटेच्या कुटुंबीयांना तिने अभिनेत्री व्हावं असं वाटत नव्हतं. राधिकाने बॉलिवूडमध्ये करिअर करावं अशी त्यांची इच्छा नव्हती. तर, राधिकाने नृत्यात करिअर करावं, अशी तिच्या पालकांची इच्छा होती. त्याचवेळी राधिका जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिला कळालं की तिच्या गडद रंगामुळे आणि सरासरी दिसण्यामुळे तिला काम मिळण्यास त्रास होणार होता.


अशा परिस्थितीत जेव्हा राधिकाला 'शोर इन द सिटी' नंतर इतर कोणत्याही चित्रपटात काम मिळालं नाही. तेव्हा ती नृत्य शिकण्यासाठी परदेशात गेली. पण आज राधिका आपटे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.


या चित्रपटासाठी राधिकाने केला फोन सेक्स
बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. त्याचवेळी, ती स्वतःला कोणत्याही पात्राशी अगदी सहजपणे जुळवून घेते. या अभिनेत्रीने आपलं नाव बनवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. बातम्यांनुसार, राधिकाने तिच्या चित्रपटासाठी असं काही केलं आहे, जे करताना कोणतीही अभिनेत्री नक्कीच 100 वेळा विचार करेल.


वास्तविक, एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं आहे की, तिने देव डी चित्रपटात फोन सेक्स देखील केला आहे. देव डी चित्रपटातील राधिका आपटेच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती आणि या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला खूप ओळख मिळाली होती, या चित्रपटात तिच्यासोबत अभय देओल होता.


एका मुलाखतीमध्ये बोलताना राधिकाने या बाबत मोठं वक्तव्य केलं होतं की, विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन देण्यासाठी तिने एका वेगळ्याच मार्गाचा अवलंब केला होता. याबद्दलचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला.


तिने सांगितलं की, चित्रपटांमध्ये त्या सीनसाठी खूप जास्त कामुक आणि बोल्डनेसची आवश्यकता होती. परंतु त्यावेळी मी नात्यात होते म्हणून इतर कोणासाठीही तशी भावना मनात येणं अशक्य होतं. त्यावेळी सीन शूट करण्याआधी मी माझ्या पार्टनरला फोन करून आम्ही बेडवर करत असलेल्या गोष्टींची चर्चा केली आणि त्याला डोक्यात ठेवूनच तो सीन दिला. आज देखील राधिका आपटेचा तो इंटिमेंट सिन युट्युबवर सर्वाधिक पाहिलेल्या सीन्सपैकी एक आहे.